मुंबई पोलिस दलातील पोलिसाचा चाळीसगावात खून : पसार आरोपीला जळगाव गुन्हे शाखेकडून अटक


Chalisgaon murder of Mumbai police force : Pasar accused arrested by Jalgaon crime branch चाळीसगाव : मुंबई पोलिस दलात कार्यरत असलेल्या शुभम अर्जुन आगोणे (28, चाळीसगाव) या तरुणाची चाळीसगावात क्रिकेट स्पर्धेच्या वादातून हत्या करण्यात आली होती. हत्येप्रकरणी सुरूवातीला चार आरोपींना अटक करण्यात आल्यानंतर पसार असलेल्या पाचव्या आरोपीला जळगाव गुन्हे शाखेने जामनेर येथून अटक केली आहे. विष्णू कोळी (22, कोळीवाडा, चाळीसगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

क्रिकेटच्या वादातून झाली हत्या
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चाळीसगाव तालुक्यातील ओझर येथे गत रविवारी सकाळी क्रिकेटचे सामने झाले. या सामन्यावेळी एका गटासोबत शुभम आगोणे या तरुणाचा वाद झाला होता व त्यानंतर रविवारी सायंकाळी हा वाद उफाळून आल्यानंतर चौघांनी तलवारीने शुभमवर पाटणारोड रोडवरील बामोशी बाबा दर्ग्याजवळ हल्ला केल्याने शुभमचा मृत्यू ओढवला होता.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !