नीम येथे कृषिदूतांकडून शेतकर्‍यांना मार्गदर्शन


Guidance to Farmers by Agricultural Envoys at Neem अमळनेर  : अमळनेर तालुक्यातील येथे कृषिदूतांकडून शेतकर्‍यांना विविध विषयांवर प्रात्यक्षिक करून मार्गदर्शन केले जात आहे. नवलभाऊ कृषी महाविद्यालय, अमळनेर येथील अंतिम वर्षातील विद्यार्थी या ठिकाणी दाखल झाले आहेत.

हे कृषिदूत दाखल
या कृषिदूतांमध्ये भावेश अनिल सावंत, प्रल्हाद अशोक आवारे, यश मोतीलाल माळी, भावेश अरुण पाटील, मनीष अरुण पाटील यांचा समावेश आहे. त्यांनी ग्रामीण कृषी जागरुकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव योजना कार्यक्रमांतर्गत सर्वेक्षण केले. सरपंच भगवान भील, उपसरपंच राजेंद्र चौधरी, ग्रामसेवक जगदीश पाटील,शेतकरी महेश पाटील, स्वप्नील पाटील, घनश्याम पाटील, प्रताप पाटील यांनी कृषिदूतांचे स्वागत केले.

कृषिदूतांनी पीक लागवड पद्धती, आधुनिक शेतीची माहिती, माती व पाणी परीक्षण, कीड आणि रोग यांचे एकात्मिक व्यवस्थापन, शेतीविषयक विविध समस्या याविषयी मार्गदर्शन केले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !