चाळीसगावातील शुभम आगोणे खून खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालणार

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पोलिस महासंचालक व एस.पीं.ना आदेश : आमदार मंगेश चव्हाण यांच्या मागणीची दखल


Shubham Agone murder case in Chalisgaon will be conducted in fast track court चाळीसगाव : मुंबई पोलिस दलातील कॉन्स्टेबल व चाळीसगाव येथील रहिवासी शुभम आगोणे याची किरकोळ वादातून चाळीसगावात निर्घृण हत्या झाली होती. या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक व्हावी व शुभम आगोणे खुनाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यात यावा यासाठी राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन व चाळीसगाव मतदारसंघाचे आमदार मंगेश चव्हाण यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथे भेट घेतली. या घटनेची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेत तत्काळ राज्याचे पोलिस महासंचालक व जळगाव जिल्हा पोलिस अधिक्षक यांना फोन करून याबाबत आरोपींविरोधात सक्त कारवाईच्या सूचना दिल्या. या प्रकरणात विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती करण्याचे आदेश देत पोलिसांवर असा हल्ला सहन केला जाणार नाही, असा संदेश पोहोचविणे गरजेचे असल्याने आरोपींना कठोर शिक्षा होण्यासाठी शुभम आगोणे खून खटला हा फास्ट ट्रॅकवर नेण्यासाठी स्वतः लक्ष घालावे तसेच महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी कायदा (मोक्का) आरोपींना लावण्याबाबत देखील त्यांनी पोलिस महासंचालकांना व जिल्हा पोलीस अधीक्षकांना निर्देश दिले. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असणार्‍या शुभम आगोणे खून प्रकरणाच्या तपासाला आता अधिक गती मिळणार आहे.

आमदारांनी दिले होते आश्वासन
काही दिवसांपूर्वीच मंत्री गिरीश महाजन व चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी शुभम आगोणे यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले होते. तसेच या हत्येच्या निषेधार्थ निघालेल्या आक्रोश मोर्चात देखील आमदार मंगेश चव्हाण यांनी सदर खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याचे आश्वासन दिले होते.



आरोपींविषयी जनमानसात संतापाची लाट
कै.शुभमचे वडील श्री.अनिल आगोणे हेदेखील पोलिस दलातून सेवानिवृत्त झालेले कर्मचारी आहेत. एक चांगला क्रिकेटपटू असणारा शुभम एक मनमिळावू आणि सर्वांशी आपुलकीने वागणारा होता. त्याच्या पश्चात आई-वडील, पत्नी व एक वर्षांचा लहान मुलगा आहे. एका पोलिसाच्या दिवसाढवळ्या हत्येमुळे सर्व चाळीसगाव तालुका शोकसागरात बुडाला असून आरोपींविषयी तीव्र संतापाची लाट ज आहे. कै.शुभम ला न्याय मिळावा म्हणून सोमवार, 22 जानेवारी रोजी आक्रोश मोर्चाचे आयोजन चाळीसगाव शहरात करण्यात आले होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !