जळगाव जिल्ह्यातील बालकल्याण समिती अखेर बरखास्त


Child welfare committee of Jalgaon district was finally dissolved जळगाव : जळगाव जिल्ह्यातील खडके, ता एरंडोल येथे कै. य. ब. पाटील मुलींच्या बालगृहात लैंगिक शोषणाची घटना घडल्याप्रकरणी बालकल्याण समिती अध्यक्षा देवयानी गोविंदवार, सदस्या विद्या बोरनारे, संदीप पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर बालकल्याण समिती बरखास्त करण्यासाठी विद्यार्थी संघटनेने वेळोवेळी तक्रारी करून पाठपुरावा केला होता. त्यानंतर महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनचे राज्य उपाध्यक्ष अ‍ॅड. दीपक सपकाळे, जिल्हाध्यक्ष रोहन महाजन, महानगराध्यक्ष प्रथमेश मराठे यांनी 19 जानेवारीपासून उपोषण सुरू केले होते. याची दखल घेत बालकल्याण समिती बरखास्त करण्यात आली आहे. याबाबतचे राजपत्र 25 जानेवारी रोजी राज्यपालांच्या आदेशानुसार महाराष्ट्र शासनाचे सचिव वि. रा. ठाकूर यांनी काढले आहे.

आदेशाची प्रत दिल्यानंतर उपोषण मागे
जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी डॉ. वनिता सोनगत यांनी 26 जानेवारी रोजी उपोषणस्थळी येऊन बालकल्याण समिती समाप्तीच्या आदेशाची प्रत दिली. त्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !