मध्य रेल्वे विशेष गाड्यांच्या 90 फेर्या वाढवल्या
90 trips of Central Railway special trains have been extended भुसावळ : आगामी उन्हाळी सुट्या व रेल्वे प्रवाशांची वाढलेली गर्दी लक्षात घेऊन पुढील विशेष गाड्यांच्या सेवेचा विस्तार करण्यात आला. त्यात ट्रेन क्रमांक 02139 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-नागपूर द्वि-साप्ताहिक गाडीला आता 30 मे पर्यंत (30 फेर्या) मुदतवाढ देण्यात आली.
ट्रेन क्रमांक 02140 नागपूर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस द्वि-साप्ताहिक विशेष गाडीला 1 जूनपर्यंत (30 फेर्या) पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. ट्रेन क्रमांक 02144 नागपूर-पुणे साप्ताहिक विशेष गाडीला 30 मे (15 फेर्या) पर्यंत तसेच ट्रेन क्रमांक 02143 पुणे-नागपूर साप्ताहिक विशेष गाडीला 31 मे (15 फेर्या) पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. वर नमूद केलेल्या गाड्यांची वेळ, संरचना आणि थांब्यांमध्ये कोणतेही बदल नसल्याचे व प्रवाशांनी विशेष रेल्वे सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

