40 लाखांचे अर्धा किलो सोने घेवून बंगाली कारागीर फरार
Bangari craftsman absconded after taking half a kilo of gold worth 40 lakhs कोल्हापूर : 40 लाख रुपये किमतीचे सुमारे 550 ग्रॅम सोन्याचे दागिने घेऊन बंगारी कारागीराने सराफाला व्यावसायीकाच्या हातावर तुरी दिली. गुरुवारी सकाळी ही घटना कोल्हापूरात घडली. गुजरीतील कासार गल्ली येथील गरगटे कॉम्प्लेक्समध्ये तिस-या मजल्यावर राहणारा काशीनाथ बंगाली हा संशयित दागिण्यांसह पसार झाल्याने जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली जात आहे.
पोलिसांची धाव
गुजरीत दागिने घडविण्याचे काम बंगाली कारागीर करतात. विश्वासाने सराफ रोज त्यांच्याकडे लाखो रुपयांचे सोने सोपवतात. कासार गल्ली येथील गरगटे कॉम्प्लेक्समधील काशीनाथ बंगाली याच्याकडे काही सराफांनी दागिने घडविण्यासाठी सोने दिले होते. गुरुवारी सकाळी काही सराफ दागिने आणण्यासाठी गेले असता, बंगाली कारागिराचे घर बंद असल्याचे दिसले. त्याच्या मोबाइलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, फोन लागला नाही. कामगारांचेही मोबाइल बंद असल्याने सराफांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात धाव घेतली. दुपारपर्यंत तीन सराफांचे सुमारे 550 ग्रॅम सोने बंगाली कारागिराकडे असल्याची माहिती समोर आली.


जुना राजवाडा पोलिस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने गरगटे कॉम्प्लेक्समध्ये पोहचले. पोलिस निरीक्षक संजीव झाडे आणि रवींद्र कळमकर यांनी परिसराची पाहणी केली.
