तोरनमाळनजीक चारचाकी दरीत कोसळली : चौघे ठार ; दोन गंभीर


Four-wheeler falls into valley near Toranmal: Four killed; Two serious नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ नजीक गोरंबा गावापासून लेगापाणी या गावाकडे जाणारे वाहन उतारावरून घसरून दरीत कोसळल्याने झालेल्या भीषण अपघातात चौघे ठार झाले तर दोघे गंभीर जखमी आहेत. हा अपघात गुरुवारी दुपारच्या सुमारास झाल्याचे समजते. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी धाव घेत बांबूची झोळी करीत मयत व जखमींना बाहेर आणले.

यांचा ओढवला मृत्यू
दारासिंग कुवरसिंग चौधरी (41, रा.केला पाणी, ता.धडगाव, जि.नंदुरबार), धीरसिंग पुण्या पाडवी (35, रा.केलापाणी) हे दोघे जागीच ठार झाले तर साबलीबाई दारासिंग चौधरी (38, रा.केलापाणी), कांतीलाल जेठ्या वसावे वय (30, रा.वाडीबार मोलगी, ता.अक्कलकुवा) यांचा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. जखमींना तात्काळ म्हसावद ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. चालकाचा ताबा सुटल्याने महिंद्रा मॅक्स ही प्रवाशी वाहतूक करणारी कार (टेम्पो) थेट दरीत जाऊन कोसळल्याचे सांगण्यात आले.


कॉपी करू नका.