गोजोरा येथे 27 वर्षीय तरुणाचा खून : तीन संशयित ताब्यात
Murder of 27-year-old youth in Gojora: Three suspects arrested भुसावळ : भुसावळ तालुक्यातील गोजोरा येथे एका तरुणाला 2 ते 3 जणांनी घरातून शेतात बोलावून बेदम मारहाण केल्याने तरुणाचा मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना शुक्रवार, 16 फेब्रुवारी रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलिसांना माहिती कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. विनोद गंभीर कोळी (27, रा. गोजोरा, ता.भुसावळ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
मारहाणीत झाला तरुणाचा मृत्यू
विनोद गंभीर कोळी हा तरुण आई, वडील, दोन भावांसह वास्तव्याला होता. शेतीकाम करून तो कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. शुक्रवारी दुपारच्या वेळी विनोद एकटाच असल्याचे पाहून त्याला संशयित आरोपींनी शेतात बेदम मारहाण केली. त्यात तरुण गंभीर जखमी झाला. काही ग्रामस्थांनी त्याला भुसावळ ट्रॉमा सेंटर येथे दाखल केले. तेथून जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे हलविण्यात आले. जळगाव येथील शासकीय रुग्णालयात त्याला तपासून वैद्यकीय अधिकारी डॉ.सचिन पाटील यांनी मयत घोषित केले. यानंतर कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला.


पोलिस अधिकार्यांची धाव
प्रसंगी भुसावळ तालुका पोलिस स्टेशनला माहिती मिळताच भुसावळचे पोलिस उपअधीक्षक कृष्णात इंगळे, तालुक्याचे पोलिस निरीक्षक बबन जगताप, सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल पवार यांच्यासह अधिकार्यांनी गोजोरा गाठले. भुसावळ तालुका पोलिस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. तरुणाच्या खून प्रकरणी भुसावळ तालुका पोलिसांनी दोघांना संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे. दरम्यान, कुर्हेपानाचे येथे रखवालदाराचा खून होऊन 48 तास उलटत नाही तोच भुसावळ तालुक्यात खून झाल्याने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
