ओझरखेडा धरणानजीक बनावट देशी दारूचा कारखान्यातून 45 लाखांचा मुद्देमाल जप्त

एका आरोपीला बेड्या : भुसावळ राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई : विदर्भात दारू पुरवठा झाल्याचा संशय


45 lakhs seized from fake country liquor factory near Ozarkheda dam भुसावळ : भुसावळ राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने ओझरखेडा, ता.भुसावळ येथे धरणाच्या पायथ्याशी सुरू असलेला बनावट देशी दारू निर्मितीचा कारखाना गुरुवारी रात्री उशिरा उद्ध्वस्त केला. गेल्या अनेक दिवसांपासून हा कारखाना बिनदिक्कतपणे सुरू असल्याची माहिती आहे. सुमारे 45 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका संशयिताला अटक करण्यात आली आहे. बनावट दारूचा विदर्भात मोठा पुरवठा झाल्याचा दाट संशय असून कारखाना चालवणार्‍या बड्या म्होरक्यांवर आता प्रामाणिकपणे कारवाई होण्याची अपेक्षा आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
भुसावळ राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक सुजित कपाटे व सहकार्‍यांनी गुरुवारी रात्री बनावट दारूच्या कारखान्यावर छापेमारी केली. या कारखान्यात बनावट देशी दारूची निर्मिती सुरू असताना पथकाने एका संशयिताला बेड्या ठोकल्या. गेल्या अनेक दिवसांपासून या कारखान्यातून बनावट दारूची निर्मिती सुरू होती व या दारूचा पुरवठा विदर्भात खान्देशात झाल्याचा दाट संशय आहे. त्या दृष्टीने पथकाकडून कसून तपास सुरू आहे.



45 लाखांचा मुद्देमाल जप्त
पट.पथकाने बनावट दारूच्या कारखान्यातून 19 लाख 25 हजार रुपये किंमतीच्या देशी दारू रॉकेट संत्रा कंपनीच्या 55 हजार सीलबंद बाटल्या, पाच लाख दहा हजार रुपये किंमतीची बनावट दारू (जागीच नाश), दोन लाख 60 हजार रुपये किंमतीची एक हजार तयार दारू (जागीच नाश), देशी दारू रॉकेट संत्राचे 1500 कागदी पुठ्ठे, दोन लाख 30 हजार रुपये किंमतीच्या 66 हजार प्लॉस्टीक बाटल्या (90 एम.एल.), 75 हजार रुपये किंमतीची 50 हजार बुच, साडेचार लाखांचे दारू बॉटल्स सील करण्याचे मशीन यासह प्लॅस्टीक ट्रेख इसेंस व आर मशीन मिळून 45 लाख 32 हजार 500 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

यांनी उद्ध्वस्त केला कारखाना
राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक डॉ.व्ही.टी.भूकन यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय निरीक्षक सुजित कपाटे, निरीक्षक अन्वर खतीब, डी.एम.चकोर, राजेश सोनार, आर.डी.सोनवणे, अमोद भडागे, निलेश दारूंटे, शिवनाथ भगत, एस.बी.चव्हाणके, विठ्ठल बाविस्कर, वाहन चालक सागर देशमुख, रघुनाथ सोनवणे, गोकुळ अहिरे, सहाय्यक निरीक्षक ईश्वर बाविस्कर, नरेंद्र पाटील, सुरेश मोरे, नितीन पाटील, योगेश राठोड, अमोल पाटील, शशिकांत पाटील, कुणाल सोनवणे, दिनेश पाटील, गिरीश पाटील, नंदू नन्नवरे, विठ्ठल हाटकर, धनसिंग पावरा, मनोज मोहिते आदींच्या पथकाने ही कारवाई केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !