यावल महाविद्यालय आणि पाल कृषी विज्ञान केंद्रात सामंजस्य करार
यावल : यावल महाविद्यालय आणि कृषी विज्ञान केंद्र पाल यांच्यात कृषी उन्नती’ सामंजस्य करार करण्यात आला. कराराचा कार्यक्रम कृषी विज्ञान केंद्र, पाल येथे झाला. हा करार तीन वर्षासाठी असून कृषी क्षेत्रातील विविध योजना शेतकर्यांपर्यंत पोहोचविण्याच्या संदर्भात तसेच आधुनिक शेतीतून समृद्धीकडे वाटचालीकरीता महाविद्यालयाकडून जनजागृती केली जाणार आहे.
तीन वर्षांसाठी सामंजस्य करार
जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्र.प्राचार्या डॉ.संध्या सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली यावल महाविद्यालय आणि कृषी विज्ञान केंद्र पाल यांच्यामध्ये तीन वर्षासाठी कृषी क्षेत्रातील विविध योजना शेतकर्यांपर्यंत पोहोचविण्याच्या संदर्भात तसेच आधुनिक शेतीतून समृद्धीकडे वाटचाल ह्याबद्दल कृषी उन्नती सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी कृषी विज्ञान केंद्र पालचे सचिव अजित खुशाल पाटील तसेच कृषी विज्ञान केंद्र पालचे शास्त्रज्ञ महेश महाजन, डॉ.अनिल पाटील उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. अर्जुन पाटील, प्रा.एम.डी.खैरनार उपस्थित होते.


उत्पादनात होण्यासाठी मार्गदर्शन गरजेचे
अजित पाटील म्हणाले की, यावल तालुक्यामध्ये शेती व्यवसाय हाच शेतकर्यांच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत आहे पारंपरिक शेतीला आधुनिक शेतीची जोड देऊन उत्पादनात वाढ करण्यासाठी शेतकर्यांना मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. प्र.प्राचार्य डॉ.संध्या सोनवणे म्हणाल्या की, यावल तालुक्यातील शेत शिवाराची कृषी क्षेत्रात उन्नती व्हावी या हेतूने तसेच विद्यार्थ्यांना आधुनिक शेतीची माहिती व्हावी हेतूने कृषी विज्ञान केंद्र पाल आणि यावल महाविद्यालय यांच्यात सामंजस्य करार महत्त्वाचा आहे. असे सांगितले. उपप्राचार्य प्रा.संजय पाटील, डॉ.सुधीर कापडे, डॉ.हेमंत भंगाळे, डॉ.आर.डी.पवार, डॉ.प्रल्हाद पावरा, प्रा.मयुर सोनवणे उपस्थित होते. यशस्वीतेसाठी डॉ.संतोष जाधव, प्रा.सुभाष कामडी, प्रा.छात्रसिंग वसावे, डॉ.निर्मला पवार, डॉ.वैशाली कोष्टी, मिलिंद बोरघडे, प्रमोद कदम, संतोष ठाकूर यांनी परीश्रम घेतले. विद्यार्थी मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित होते.
