किनगावात मिरवणूक मार्गाची पोलिसांकडून पाहणी


Police inspection of the procession route in Kingaon यावल : यावल तालुक्यातील किनगाव येथे आगामी 19 फेब्रुवारी रोजी साजरा होणार्‍या छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या मिरवणूक मार्गाची पाहणी यावल पोलिसांच्या वतीने करण्यात आली. मिरवणूक मार्गावरील अडथळे, त्याचप्रमाणे संवेदनशील मार्गातून मिरवणूक जाणार नाही व मिरवणुकीद्वारे इतर धर्मियांच्या भावना दुखवल्या जाणार नाही याची दक्षता घेण्यात यावी अशा सूचना त्यांनी प्रसंगी आयोजकांना करण्यात आल्या.

यांची होती उपस्थिती
किनगाव, ता.यावल येथे 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली जाणार आहे. यानिमित्त मुख्य उत्सव समितीच्या वतीने गावात मिरवणूक काढली जाणार आहे. या मिरवणुकीचे आयोजक तसेच उत्सव समितीचे पदाधिकारी यांच्याशी यावलचे सहायक पोलिस निरीक्षक हरीष भोये, सहायक पोलिस निरीक्षक विनोदकुमार गोसावी, पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र साळुंखे, सुशील घुगे यांनी गावातील मिरवणूक मार्गाची पाहणी केली. कशा पद्धतीने मिरवणूक काढली जाईल व मिरवणुकीचा मार्ग कसा असेल या मिरवणूक मार्गावरील अडथळे यांची पाहणी करण्यात आली तसेच मिरवणुकी दरम्यान इतर धर्मियांच्या भावना दुखावल्या जाणार नाही याबाबत उत्सव समितीच्या पदाधिकार्‍यांनी दक्षता घ्यावी अशा सूचना सहा.पोलिस निरीक्षक हरीष भोये यांनी पदाधिकार्‍यांना केल्या व मिरवणूक मार्गाची पाहणी केली. संवेदनशील गावांमध्ये देखील आपण आगामी काळात मिरवणूक मार्गाची पाहणी करणार आहोत, असे त्यांनी सांगितले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !