अंबड पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षकांची पोलिस ठाण्यातच गोळी झाडून आत्महत्या
A police inspector of Ambad police station committed suicide by shooting himself in the police station itself अंबड : अंबडचे पोलीस निरीक्षक अशोक नजन यांनी मंगळवारी सकाळी पोलीस आण्यात आल्यानंतर आपल्या कक्षात डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. या घटनेने पोलीस वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली. या घटनेने नाशिकसह राज्यात खळबळ उडाली आहे. सर्वच वरीष्ठ पोलीस आधिकारी अंबड पोलीस ठाण्यात दाखल झाले असून निरीक्षकाने आत्महत्या का केली? याचे कारण अद्याप स्पष्ट होवू शकले नाही.
काल बंदोबस्त अन आज केली आत्महत्या
अशोक नजन हे मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे अंबड पोलीस स्टेशन मध्ये ड्युटीवर हजर झाल्यानंतर त्यांच्या कक्षात गेले व त्यांनी स्वतःच्या सर्व्हिस रीव्हॉल्व्हरमधून गोळी झाडत आत्महत्या केली.


वरीष्ठ अधिकार्यांची धाव
घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहायक पोलीस आयुक्त शेखर देशमुख, वरीष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर हे पोलीस ठाण्यात दाखल झाले तर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हे शाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव हेदेखील पोलीस ठाण्यात दाखल झाले. पोलीस निरीक्षकांनी आत्महत्या का केली? याचे अद्याप कारण कळू शकलेले नाही.
