भुसावळ तहसील कार्यालयासमोर शेतकर्‍यांचे ठिय्या आंदोलन


Farmers protest in front of Bhusawal Tehsil Office भुसावळ : भुसावळ तालुका दुष्काळी जाहीर होवून शेतकर्‍यांना मदत मिळालेली नाही शिवाय पीक विम्याची रक्कमही पदरात न पडल्याने तालुक्यातील विविध भागात शेतकर्‍यांनी मंगळवारी सकाळी एकत्र येत तहसील कार्यालयासमोर ठिय्या मांडला. यावेळी शेतकर्‍यांनी राज्य शासनाविषयी तीव्र रोष व्यक्त केला.

तालुक्यातील शेतकर्‍यांचा तहसीलबाहेर ठिय्या
भुसावळ तालुक्यातील शेतकर्‍यांनी एकत्र येत भुसावळ तहसील कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केले. भुसावळ तालुका नोव्हेंबरमध्ये दुष्काळी जाहीर झाल्यानंतरही शेतकर्‍यांना मदत मिळालेली नाही शिवाय पीक विम्याचा अद्यापही लाभ मिळालेला नाही, कापसाला हमी भावापेक्षाही अल्प भाव मिळत असल्याने या संदर्भात तोडगा निघावा, अशी मागणी शेतकर्‍यांनी यावेळी केली. यावेळी तालुक्यातील शेतकर्‍यांनी तहसीलदार निता लबडे यांना मागण्यांचे निवेदन दिले.



कापसाकडून निराशा
कापसाला भाव मिळेल या आशेने जादा प्रमाणात पिकावर खर्च केला त्यात बोंडअळी आणि दुष्काळाने उत्पन्नात घट असून कापूस पीकाला हमीभावापेक्षा देखील कमी भाव मिळत आहे. यामुळे कापूस पिकाची दरवाढ करावी आदी मागण्यांसाठी शेतकर्‍यांनी तहसील कार्यालयासमोर ठिय्या मांडून निदर्शने केली. या आंदोलनात भुसावळ तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !