ही बातमी रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची : उधना ते जयनगर दरम्यान विशेष रेल्वे धावणार !
A special train will run between Udhna and Jayanagar! भुसावळ : उन्हाळी सुट्यांमुळे आगामी काळात रेल्वे गाड्यांना वाढणारी गर्दी पाहता उधना ते जयनगर दरम्यान विशेष रेल्वे गाडी चालविण्यात येत आहे. ही गाडी भुसावळ जंक्शनवरून जाणार असल्याने प्रवाशांची सोय होणार आहे.
असे आहे गाडीचे शेड्यूल
विशेष गाडी क्रमांक 09039 उधना-जयनगर साप्ताहिक विशेष गाडी 21 फेब्रुवारी 2024 ते 13 मार्च 2024 पर्यंत दर बुधवारी उधना येथून रात्री 8.35 वाजता सुटेल आणि तिसर्या दिवशी जयनगरला सकाळी 6.30 वाजता पोहोचेल. विशेष गाडी क्रमांक 09040 जयनगर-उधना साप्ताहिक विशेष गाडी जयनगर येथून 23 फेब्रुवारी ते 15 मार्चपर्यत दर शुक्रवारी सकाळी 11.30 वाजता सुटेल आणि दुसर्या दिवशी रात्री 10 वाजता उधना येथे पोहोचेल.


ही गाडी चलथान, नंदुरबार, भुसावळ, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज चौकी, पंडित दिन दयाल उपाध्याय, बक्सर, आरा, पाटणा, बरौनी, समस्तीपूर, दरभंगा, मधुबनी येथे थांबणार आहे. या गाडीला 10 स्लीपर क्लास, आठ सामान्य द्वितीय श्रेणी आणि गार्डस् ब्रेक व्हॅन आणि 2 जनरेटर कम लगेज ब्रेक व्हॅन असे डबे असतील.
