भुसावळात लोकशाही दिनाला दांडी : अधिकार्‍यांना तहसीलदारांकडून नोटिस


Dandi on Democracy Day in Bhusawal: Notice to Officers from Tehsildar भुसावळ : दर महिन्याच्या तिसर्‍या सोमवारी महिला लोकशाही दिनाचे आयोजन तहसील कार्यालयात केले जाते मात्र कुणीही अधिकारी लोकशाही दिनाला हजर राहत नसल्याने अश्या दांडी मारणार्‍या अधिकार्‍यांना तहसीलदार निता लबडे यांनी कारणे दाखवा नोटिसा काढण्याच्या सूचना केल्याने शासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

दोन वर्षांपासून अधिकार्‍यांचा निरूत्साह
तहसील कार्यालयात दर महिन्याच्या तिसर्‍या सोमवारी महिला लोकशाही दिन घेण्याच्या सूचना सरकारने काढलेले आहे. तक्रारदारांच्या तक्रारी ऐकून घेऊन त्यांच्या समस्या संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांशी चर्चा करून त्या दूर केला जाव्यात, असे निर्देश आहे मात्र प्रत्यक्षात तसे काहीही घडत नाही. गेल्या दोन वर्षापासून येथील तहसीलदार कार्यालयात आयोजीत केलेल्या लोकशाही दिनाला तहसीलदार यांच्या व्यक्तीरिक्त अन्य विभागाचे कोणीही अधिकारी उपस्थित राहात नाही, शासनाच्या सूचनेनुसार प्रत्येक शासकीय कार्यालयातील संबंधित जबाबदार अधिकारी, प्रमुखांनी लोकशाही दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून त्याच्या कार्यालयाशी असलेल्या तक्रारी सोडविण्यासाठी नियोजन करावे, अश्या सूचना केल्या आहे.



गैरहजर असलेल्या अधिकार्‍यांना नोटीसा
सोमवारी शिवजयंती असल्याने शासकीय कार्यालयांना सुटी होती त्यामुळे मंगळवारी लोकशाही दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते मात्र, तहसीलदार लबडे यांच्या व्यक्तीरीक्त कोणीही अधिकारी उपस्थित नव्हते. शासनाच्या सूचना असतांना सुध्दा कोणीही अधिकारी उपस्थित राहात नसल्याने तहसीलदार निता लबडे यांनी संबंधित लिपीक भाऊसाहेब शिरसाठ यांना सूचना करीत लोकशाही दिनाला गैर हजर राहणार्‍या अधिकार्‍यांना नोटिस काढून त्यांच्याकडून खुलासा मागविण्याचे नमूद केले आहे.

ठेवीदारांनी केल्या तक्रारी
लोकशाही दिनात तक्रारी करण्यासाठी ठेवीदार आले होते, सहकार विभागाकडून ठेवीदारांनी केलेल्या तक्रारींची कुठीही दखल घेतली जात नसल्याची तक्रार ठेवीदार महिलांमधून केली जात होती. यामुळे लोकशाही दिनात अधिकार्‍यांनी हजर राहण्याची मागणी करण्यात आली. दरम्यान, भुसावळचे माहिती अधिकार कार्यकर्ते केदार यांनी लोकशाही दिनाला तहसीलदार हजर राहत नसल्याची तक्रार जिल्हाधिकारी व महसूल आयुक्तांकडे केली आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !