भुसावळातील संशयिताला दिल्ली स्पेशल सेलच्या पोलिसांकडून अटक


Suspect from Bhusawal arrested by Delhi Special Cell Police भुसावळ : दिल्ली स्पेशल सेलच्या पोलिसांनी गुरुवारी दुपारी भुसावळातील दत्तनगर, खडका रोड भागातून हनीफ शेख मोहम्मद हनीफ (47, दत्तनगर, मेहराज बिल्डींग, खडका रोड, भुसावळ) या संशयिताला अटक केल्याने शहरासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. दिल्ली येथे 2001 मध्ये दाखल सीमी प्रकरणात संशयित फरार असल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे दिल्ली स्पेशल सेलच्या अधिकार्‍यांनी सांगितले.

अत्यंत गोपनीयरीत्या कारवाई
दिल्ली स्पेशल सेलच्या 16 अधिकारी व कर्मचार्‍यांचे पथक गुरुवारी दुपारी दोन वाहनांद्वारे शहरात धडकल्यानंतर त्यांनी स्थानिक बाजारपेठ पोलिसांची मदत घेत संशयीत हनीफ शेख मोहम्मद हनीफ (47, दत्तनगर, मेहराज बिल्डींग, खडका रोड, भुसावळ) यास ताब्यात घेतले. संशयिताविरोधात 2001 मध्ये प्रतिबंधित दहशतवादी संघटना ‘सिमी’ शी निगडीत एका प्रकरणात गुन्हा दाखल असून या गुन्ह्यात संशयित फरार असल्याने त्यास अटक करण्यासाठी पथक शहरात आल्याचे पोलीस निरीक्षक पवन कुमार यांनी सांगितले.



बंदोबस्तात अधिकारी दिल्लीला रवाना
सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास अतिरीक्त सत्र न्यायालयात संशयिताला हजर करण्यात आले व 48 तासांचा ट्रान्झीट रीमांड घेण्यात आला. यावेळी न्यायालय आवारात मोठी गर्दी जमली होती. स्थानिक पोलिसांसह एटीएसचे कर्मचारी हजर होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !