तीन गावठे कट्टे व आठ जिवंत काडतूसांसह शिरूरचे संशयित जाळ्यात

चोपडा ग्रामीण पोलिसांची कारवाई : शस्त्र तस्करी पुन्हा ऐरणीवर


Suspects from Shirur nabbed with three Gawathe Kattes and eight live cartridges चोपडा : चोपडा ग्रामीण पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे पुणे जिल्ह्यातील शिरूर भागातील तीन संशयितांना तीन गावठे कट्टे व आठ जिवंत काडतूसांसह पकडल्याने खळबळ उडाली. या कारवाईने पुन्हा शस्त्र तस्करीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. जफर रहिम शेख (रा.भाजी बाजार, घोड नदी, शिरुर, जि.पुणे), तबेज ताहीर शेख (रा.सेंटर दवाखान्या समोर, रीव्हेलीन कॉलनी, शिरुर, जि.पुणे) व कलीम अब्दुल रहेमान सय्यद (34) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

गोपनीय माहितीवरून कारवाई
चोपडा तालुक्यातील सत्रासेनमार्गे एका राखाडी रंगाच्या ईर्टीका वाहनाने तिघे तरुण गावठी कट्टे घेऊन निघाल्याची माहिती चोपडा ग्रामीण पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी शुक्रवारी मध्यरात्रीनंतर बुधगाव गावानजीक सापळा रचला. संशयिताचे वाहन येताच त्यातून तिघांची अंग झडती घेतल्यानंतर तिघांकडे तीन कट्टे, आठ जीवंत काडतूस आढळल्याने संशयितांना अटक करण्यात आली. कट्टे व वाहनासह आठ लाख 42 हजार 500 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. संशयितांविरोधात चोपडा ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

यांनी केली कारवाई
ही कारवाई चोपडा ग्रामीण पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्या मार्गदर्शनाखाली शशिकांत पारधी, चालक हवालदार किरण आसाराम धनगर, एएसआय राजू महाजन, एएसआय देविदास ईशी, प्रमोद पारधी, मनीष गावीत, विनोद पवार, महेंद्र भिल, संदीप निळे, होमगार्ड श्रावण तेली, होमगार्ड संजय चौधरी आदींच्या पथकाने केली.


कॉपी करू नका.