खासदार रक्षा खडसेंच्या विजयासाठी झटून कामाला लागा : प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे

0

मुक्ताईनगर : रावेर लोकसभेतील महायुतीच्या उमेदवार खासदार रक्षा खडसे यांना तिसर्‍यांदा खासदार करण्यासाठी कार्यकर्त्यांनी झटून कामाला लागावे व जास्तीत-जास्त मताधिक्य मिळवून त्यांना निवडून आणावे, असे आवाहन भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी केले. संत मुक्ताई साखर कारखाना, घोडसगाव (मुक्ताईनगर) येथे आयोजित पदाधिकार्‍यांच्या बैठकीत ते बोलत होते.

प्रदेशाध्यक्षांनी घेतला आढावा
रावेर लोकसभा निवडणुकीतील महायुतीच्या उमेदवार खासदार रक्षाताई खडसे यांच्या प्रचार नियोजनार्थ महायुतीतील पदाधिकारी बैठक झाली. गुरुवारी भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी बैठकीत मार्गदर्शन केले. बावनकुळे यांनी महायुतीमधील सर्व मित्र पक्षाच्या पदाधिकार्‍यांशी संवाद साधून, आढावा घेतला तसेच समस्या जाणून घेऊन, प्रधानमंत्रीनरेंद्र मोदी यांना सलग तिसर्‍यांदा प्रधानमंत्री बनविण्यासाठी महायुतीच्या उमेदवार रक्षाताई खडसे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन केले. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


कॉपी करू नका.