श्रीरामपूरातील राज्य उत्पादन शुल्क विभागाचा लाचखोर सहाय्यक दुय्यम निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात

0

श्रीरामपूर : शासनमान्य देशी दारू विक्रेतत्याचा व्यवसाय सुरळीतपणे चालू देण्यासाठी व त्यांच्या बियरबार परमी रूमवर कायदेशीर कार्यवाही न करण्याच्या मोबदल्यात 11 हजारांची लाच मागून ती स्वीकारताना श्रीरामपूर राज्य उत्पादन शुल्क विभागातील सहाय्यक दुय्यम निरीक्षक खलील खुर्शीद शेख (40, रा. खडकी रोड, चर्चसमोर, कोपरगाव, जि.अहमदनगर) यास नाशिक एसीबीने रंगेहाथ अटक केली.

असे आहे लाच प्रकरण
25 वर्षीय तक्रारदार हे शासनमान्य देशी दारू विक्रेते आहेत. त्यांचा व्यवसाय सुरळीत चालू देण्यासाठी व त्यांच्या बियर बार परमिट रूमवर कायदेशीर कार्यवाही न करण्याच्या मोबदल्यात आरोपी खलील शेख यांनी 2 मे रोजी 11 हजारांची लाच मागितली होती. एसीबीकडे तक्रार दिल्यानंतर सापळा रचण्यात आला व पंचांसमक्ष लाच स्वीकारताच आरोपीला अटक करण्यात आली. आरोपीविरोधात कोपरगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.

यांनी केला सापळा यशस्वी
नाशिक एसीबीच्या पोलीस निरीक्षक गायत्री मधुकर जाधव, पोलीस हवालदार संदीप वणवे, पोलीस हवालदार ज्योती शार्दुल आदींच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.


कॉपी करू नका.