भुसावळात आगीत नऊ फळ दुकाने खाक : 41 लाखांचे नुकसान
शॉर्ट सर्किटमुळे आगीचा संशय : फळ व्यापार्यांवर मोठे आर्थिक संकट
Nine fruit shops gutted in fire in Bhusawal : loss of 41 lakhs भुसावळ : शहरातील आठवडे बाजार भागातील फळ विक्री करणार्या विक्रेत्यांची नऊ गोदामे आगीत भस्मसात झाल्याची धक्कादायक घटना रविवारी पहाटेच्या सुमारास घडली. आगीचे ठोस कारण समोर आले नसलेतरी शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा संशय आहे. आगीचा भडका पसरताच लगतच्या नऊ दुकानांमध्ये आगीचे लोण पसरले. या आगीमुळे व्यापार्यांचे सुमारे 41 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. भुसावळ पालिकेच्या अग्निशमन बंबांच्या सहाय्याने काही वेळेत आगीवर नियंत्रण मिळवले.
आगीत नऊ दुकाने खाक
भुसावळ शहरातील आठवडे बाजार परीसरात भाजपाला व फळ विक्री करणार्या विक्रेत्यांची मोठी गोदामे आहेत. या गोदामात शॉर्ट सर्किट झाल्यानंतर आग लागली व पाहता-पाहता आगीचे लोण नजीकच्या दुकानांमध्ये पसरताच नऊ दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. मध्यरात्रीच्या सुमारास आगीचा प्रकार घला तर पहाटेच्या सुमारास आगीचा प्रकार लक्षात आल्यानंतर नागरीकांनी भुसावळ पालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण करताच काहीच वेळेत बंद दाखल झाला मात्र तो पर्यंत नऊ दुकानांसह त्यातील साहित्याचे नुकसान झाले होते. सुमारे तासाभरात आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले असलेतरी या आगीत नऊ दुकान त्यातील मोसंबी, संत्री, द्राक्षे आदी मालाचे नुकसान झाल्याने 41 लाखांवर नुकसान झाल्याचे सांगण्यात आले.


या व्यापार्यांवर आर्थिक संकट
फळ व्यापारी आसीफ बागवान, युनूस बागवान, गुड्डू बागवान, भगवान चौधरी, बबलू चौधरी, व भोई आदींसह अन्य तीन अशा एकूण नऊ व्यापार्यांचे सुमारे 41 लाखांहूनही अधिक नुकसान झाले. बर्याच फळ व भाजीपाला विक्रेत्यांनी रविवारच्या बाजारासाठी अधिक प्रमाणात माल आणला मात्र आगीच्या घटनेत या मालाचे नुकसान झाले.