पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना दोन वर्ष मुदतवाढ
Director General of Police Rashmi Shukla extended by two years मुंबई : राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला या जूनमध्ये सेवानिवृत्त होणार होत्या मात्र त्यांना आता दोन वर्षांची मुदतवाढ देण्यात आली आहे. शुक्ला आता जानेवारी 2026 पर्यंत राज्याच्या पोलिस महासंचालक असतील.
फोन टॅपिंग प्रकरणात रश्मी शुक्ला चर्चेत
फोन टॅपिंग प्रकरणी चर्चेत आलेल्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना मुदतवाढ मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. रश्मी शुक्ला यांना दोन वर्षांचा कार्यकाळ वाढवून देण्याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सकारात्मक होते. यानंतर अखेर त्यांना दोन वर्षाचा कार्यकाळ वाढवून देण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने यासंदर्भात नोटिफिकेशन काढले आहे.


2026 पर्यंत कार्यकाळ
फोन टॅपिंग प्रकरणात शुक्ला यांच्याविरोधात गुन्हाही दाखल झाला होता मात्र, पुढे न्यायालयाने त्यांना क्लीन चिट दिली होती. फोन टॅपिंग प्रकरणात विरोधी नेत्यांचे फोन बेकायदेशीर रेकॉर्ड केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला होता. त्यावेळी राज्य गुप्तचर विभागाच्या प्रमुख रश्मी शुक्ला होत्या. जानेवारी 2024 मध्ये आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक आणि महानिरिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आता जानेवारी 2026 पर्यंत राज्याच्या पोलीस महासंचालक पदावर राहणार आहेत.