अट्टल घरफोड्या व दुचाकी चोरटा जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात

सात गुन्ह्यांची कबुली : चोरी केलेल्या तीन दुचाकी जप्त


Confession of seven offences : Three stolen bikes seized जळगाव : जळगाव गुन्हे शाखेने पाच दुचाकींसह दोन घरफोड्या करणार्‍या आरोपीला अटक केली आहे. संशयिताने जळगाव तालुका हद्दीत तीन, धरणगाव व अमळनेर येथून प्रत्येक एक दुचाकी चोरल्याची तसेच चोपडा व शिरपूर येथे एक घरफोडी केल्याची कबुली दिली आहे. सुरेश राजाराम बारेला (25, देवली दुगानी, ता.वरला, जि.बडवाणी) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
चोपडा पोलिसांना वॉण्टेड असलेला आरोपी सुरेश बारेला हा चोपडा शहरात आल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर त्यास महात्मा गांधी कॉलेज रोडवर पकडण्यात आले. संशयिताला दुचाकीबाबत (एम.एच.19 बी.आर.7061) विचारणा केली असता तो काहीच बोलत नसल्याने यास खोलात जावून विचारपूस केल्यानंतर त्याने भोकणी, ता.धरणगाव येथून दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली तर अन्य चार दुचाकींसह दोन ठिकाणी घरफोड्या केल्याची आरोपीने कबुली दिल्याने त्यास अटक करण्यात आली.

यांनी केली कारवाई
ही कारवाई जळगाव पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, जळगाव गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार कमलाकर बागुल, हवालदार संदीप पाटील, प्रवीण मांडोळे, गोरख बागुल, अनिल देशमुख, संदीप साळवे, ईश्वर पाटील, महेश सोमवंशी, लोकेश माळी आदींच्या पथकाने केली.


कॉपी करू नका.