अप-डाऊन कटनी पॅसेंजर आज व उद्या रद्द
भुसावळ : इटारसी-जबलपूर दरम्यानच्या सोनतलाई व बागरटावा दरम्यान रेल्वे लाईन दुहेरी करणाच्या कामासह नॉन इंटरलॉकींग कामासाठी अप-डाऊन कटनी पॅसेंजर बुधवारी व गुरुवारी प्रारंभीक स्थानकापासून रद्द करण्यात आली आहे. डाऊन 51187 भुसावळ-कटनी पॅसेंजर तसेच अप 51188 कटनी-भुसावल पॅसेंजर 19 व 20 रोजी रद्द करण्यात आली आहे. रेल्वे प्रवाशांनी याबाबत दखल घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
