देशाला विश्वगुरूपर्यंत नेणार्‍या पक्षाला मतदान करा : जळगावात गृहमंत्री अमित शहा


Vote for the party that will take the country to Vishwaguru : Home Minister Amit Shah in Jalgaon जळगाव : ही निवडणूक युवकांची आहे, निवडणूक भारताच्या भविष्याची आहे. भारतीय जनता पक्षाला मतदान म्हणजे पंतप्रधान मोदी यांना तिसर्‍यांदा देशाचे पंतप्रधान बनण्यासाठी टाकलेलं आपलं मतदान असेल. मतदान त्याच पक्षाला करा, जो पक्ष देशाला विश्वगुरूपर्यंत नेऊन ठेवेल. जो पक्ष परिवारवादाने चालतो, तो देश मजबूत करू शकते का? असा सवाल देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी जळगावात उपस्थित केला. यावेळी शहा यांनी शरद पवार यांना 50 पैकी पाच वर्षांचा हिशेब देण्याचे आव्हान केले मात्र राष्ट्रवादीत दाखल झालेले माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्याबद्दल चकार शब्दही न काढल्याने जळगाव जिल्ह्यात आगामी काळात राजकीय गणिते बदलण्याच्या चर्चेला वेग आला आहे.

मोदी है तो मुमकीन है
जळगावात मंगळवार, 5 मार्च रोजी भाजपाच्या वतीने युवा संवादाचे आयोजन करण्यात आले होते. गृहमंत्री अमित शहा यांनी युवकांशी संवाद साधताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणांनी सुरूवात केली. ते म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांनी दहशदवादी व नक्षलवादी हल्ल्यांपासून भारताला सुरक्षित करण्याचे काम केले आहे. मोदींनी भारताला समृद्धच केले आहे. मनमोहन सिंग हे देशाचे पंतप्रधान झाले. त्यावेळेस आपल्या देशाची अर्थव्यवस्था अकरावा नंबरवर होती. मोदींनी ती पाचव्या क्रमांकावर आणली. ही भारताची अर्थव्यवस्था तिसर्‍या क्रमांकावर आणण्याची गॅरंटी मोदींची असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

अजित पवारांचा उल्लेख टाळला
भाषणात राज्यातील सरकारचा उल्लेख करताना शाह यांनी मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याच नावाचा उल्लेख केला मात्र अजित पवारांबद्दल उल्लेख टाळला. मोदी व शाह यांनी काही वर्षांपूर्वी अजित पवारांवर गंभीर आरोप केले होते त्यामुळे त्यांनी आरोप टाळल्याची चर्चा आहे. शरद पवारांबद्दल शहा यांनी भाष्य केले मात्र आमदार खडसे यांच्याविषयी ते एक शब्दही बोलले नाही त्यामुळे राजकीय समीक्षक विविध परीने या बाबींचा अर्थ लावत आहेत शिवाय जिल्ह्यात आगामी काळात राजकीय गणिते बदलण्याची चर्चाही जोर धरत आहे.


कॉपी करू नका.