काँग्रेस सत्तेवर आल्यास शेतकरी जीएसटी मुक्त : राहुल गांधी यांचे आश्वासन


Farmers GST free if Congress comes to power : Rahul Gandhi promises नाशिक : देशात परिवर्तन झाल्यास शेतकर्‍यांना कर्जमाफी देण्याबरोबरच किमान हमीभाव दिला जाईल शिवाय शेतकर्‍यांना जीएसटी मुक्त करण्यात येईल, असे आश्वासन काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी नाशिकमध्ये दिले. नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे राहुल गांधी यांची एकात्मता यात्रा पोहोचली. चांदवड येथील बाजार समितीत झालेल्या जाहीर सभेमध्ये राहुल गांधी यांनी हे आश्वासन दिले.

यांची होती उपस्थिती
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री यशोमती ठाकूर, योगेंद्र यादव यांच्यासह स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.

कर्जमाफिने प्रश्न सुटणार नाहीत
देशातील शेतकरी चहू बाजूनी समस्यांनी घेरला गेला आहे त्यामुळे त्यावर तोडगा काढणे आवश्यक आहे. लोकसभा निवडणुकीत परिवर्तन झाल्यास सर्वप्रथम कर्जमाफी त्यांना देण्यात येईल, मात्र केवळ कर्जमाफी घेऊन त्यांचे प्रश्न सुटणार नाही, तर त्यांना अन्य उपाय देखील करावे लागतील, असेही राहुल गांधी म्हणाले.

जवान व किसानांच्या संरक्षणाची जवाबदारी घेणार
शेतकर्‍यांना जीएसटी लागू करण्यात आला असून उत्पादनांना त्यांना टॅक्स भरावा लागतो हा करही काढून घेण्यात येईल आणि शेतकर्‍यांना जीएसटी मुक्त करण्यात येईल, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार शेतकर्‍यांना किमान हमीभाव दिला जाईल असेही राहुल गांधी म्हणाले देशातील जवान आणि किसान या दोघांच्या संरक्षणाची जबाबदारी घेतली जाईल असेही राहुल गांधी म्हणाले.

 


कॉपी करू नका.