लग्नाच्या आमिषातून 17 वर्षीय तरुणीवर अत्याचार : पीडीता गर्भवती ; पारोळा तालुक्यातील घटना
17-year-old girl assaulted by lure of marriage: victim pregnant ; Incidents in Parola Taluk पारोळा : लग्न करण्याच्या आमिषाने पारोळा तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन तरुणीवर सातत्याने अत्याचार करण्यात आल्याने पीडीता गर्भवती राहिल्याचा धक्कायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी संशयित नाना बारकू सोनवणे (पारोळा तालुका) तालुका याच्याविरोधात पारोळा तालुक्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार
पारोळा तालुक्यातील एका गावातील पीडीता आपल्या आईसोबत वास्तव्यास आहे. पीडीतेसोबत लग्न करण्याचे आमिष दाखवून आरोपी नाना सोनवणे याने पीडीतेला वारंवार शेतात नेत तिच्याशी संबंध प्रस्थापीत केले व त्यातून पीडीता गर्भवती राहिली. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर आरोपीविरोधात पोस्को व अत्याचाराच्या कलमान्वये पारोळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव करीत आहेत.

