फोन लावण्याचा बहाणा करून मोबाईल लांबवला : जामनेरचा आरोपी गुन्हे शाखेच्या जाळ्यात


The mobile phone was extended on the pretext of using the phone : the accused of Jamner is in the net of the crime branch जळगाव : फोन लावण्यासाठी मोबाईल हवा असल्याचा बहाणा करीत तरुणाकडील महागड्या मोबाईल लांबवण्यात आल्याचा प्रकार बामणोद येथे 14 रोजी दुपारी दोन वाजता घडला होता. याप्रकरणी संशयित आरोपी जफ्फर राजू शेख (34, रा.जामनेर) याला जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवार, 20 मार्च रोजी सकाळी 10 वाजता जामनेर शहरातील जुना बोदवड नाका भागातून अटक केली.

असे आहे फसवणूक प्रकरण
यावल तालुक्यातील बामणोद येथे शुभम गणेश सोनवणे हा तरुण वास्तव्यास आहे. गुरुवार, 14 मार्च रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घरी असताना त्याला संशयित आरोपी जफ्फर शेख भेटला. फोन लावण्यासाठी मोबाईल हवा असल्याचे सांगून संशयिताने शुभमचा मोबाईल घेतला व पळ काढला. याबाबत फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.



गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या
गुन्ह्यातील पसार आरोपी हा जामनेर शहरात असल्याची गोपनीय माहिती जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील हवालदार महेश महाजन, किशोर राठोड, रणजीत जाधव, ईश्वर पाटील, प्रमोद ठाकूर यांनी संशयित आरोपी जफ्फर राजू शेख याला जामनेर शहरातील जुना बोदवड बुधवार नाका येथून बुधवार, 20 मार्च रोजी सकाळी 10 वाजता अटक केली. संशयितांकडून दोन मोबाईल हस्तगत करण्यात आले. संशयिताला पुढील कारवाईसाठी फैजपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !