चोपड्यात कुंटणखान्यावर मोठी कारवाई : 50 परप्रांतीय तरुणींची सुटका : 11 महिला दलालांवर कारवाई


Major action against Kuntankhana in Chopdya : 50 migrant girls freed: Action against 11 women brokers चोपडा : शहरातील कुंटण खान्यावर पोलिसांनी छापेमारी करीत परप्रांतीय 50 तरुणींची सुटका करीत 11 दलाल मालकिण महिलांना ताब्यात घेतले. या कारवाईने शहरासह परिसरात मोठी खळबळ उडाली. नगरपालिकेच्या मागील परिसरात कुंटणखान्यात बुधवार, 20 रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास पोलिसांनी छापा टाकला.

अवैध कुंटणखान्यावर छापेमारीने खळबळ
चोपडा शहरातील पालिकेच्या पाठीमागील परिसरात अवैधरित्या कुंटणखाना सुरू असताना चोपडा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे, शहर पोलीस ठाण्यातील निरीक्षक मधुकर सावळे व ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक कावेरी कमालकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस पथकाने कारवाई केली.



50 परप्रांतीय तरुणींची सुटका
पोलिसांच्या पथकाने बुधवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास छापा टाकला. यात जिल्ह्यासह परराज्यातील 50 तरुणी आढळल्याने त्यांची सुटका करण्यात आली तर कुंटणखाना चालवणार्‍या 11 महिलांवर चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सुटका करण्यात आलेल्या तरुणी या पश्चिम बंगाल, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, नेपाळ भागातील असल्याचे समजते.

यांनी केली कारवाई
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली चोपडा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे, चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर, एपीआय प्रशांत खंडारे, पोलीस निरीक्षक एकनाथ भिसे, पोलीस उपनिरीक्षक अनिल भुसारे, योगेश्वर हिरे, जितेंद्र सोनवणे, विलेज सोनवणे, दीपक विसावे, हरिश्चंद्र पवार, शेषराव तोरे, संतोष पारधी, ज्ञानेश्वर जवागे, महेंद्र साळुंखे, सुभाष सपकाळ, संदीप भोई, महिला विद्या इंगळे, शुभांगी लांडगे, रत्नमाला शिरसाट, रवींद्र पाटील, लव सोनवणे, प्रकाश मथुरे, प्रमोद पवार, रवींद्र बोरसे, मदन पावरा, विजय बच्छाव, अनिता हटकर यांनी ही कारवाई केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !