जामनेर तालुक्यातील गुन्हेगारांची चौकडी जळगाव जिल्ह्यातून हद्दपार


Quartet of criminals from Jamner taluka deported from Jalgaon district जळगाव : जामनेर तालुक्यातील गुन्हेगारांच्या चौकडीला जळगाव पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी एक वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार केले आहे.टोळी प्रमुख प्रदीप रायदास पाटील (24, पहूरपेठ, ता.जामनेर), शाहरूख बनेखा तडवी (23, शिवनगर, पहूरपेठ, ता.जामनेर), इरफान लालखा तडवी (23, शिवनगर, पहूरपेठ, ता.जामनेर) व शेख राज शेख समद (24, ख्वाजा नगर, पहूरपेठ, ता.जामनेर) अशी हद्दपार संशयितांची नावे आहेत. चार आरोपींविरोधात पाच गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

पाचोरा पोलीस उपअधीक्षक धनंजय येरूळे यांनी आरोपींच्या हद्दपार प्रस्तावाची चौकशी केली. हद्दपार प्रस्तावावर गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांच्या नेतृत्वात एएसआय युनूस शेख इब्राहीम, हवालदार सुनील दामोदरे यांनी काम केले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !