जळगावात तलवारीने दहशत : आरोपीला एमआयडीसी पोलिसांकडून अटक


Sword terror in Jalgaon: Accused arrested by MIDC police जळगाव : लोखंडी तलवारीद्वारे दहशत निर्माण करणार्‍या आरोपीला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. पांडुरंग सपकाळे (रा.एस.एम.आय.टी. कॉलोजवळ म्हाडा कॉलनी, जळगाव) असे अटकेतील आरोपी तरुणाचे नाव आहे.

यांनी केली कारवाई
पांडुरंग सपकाळे हा कारमधून तलवारीसह उतरतांना आढळल्याने त्याच्या ताब्यातील कार आणि तलवार जप्त करण्यात आली. कॉन्स्टेबल नितीन ठाकुर यांनी याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात फिर्याद दाखल केली. पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे, मुकेश पाटील, साईनाथ मुंडे, छगन तायडे आदींनी आरोपीला अटक केली. तपास रामकृष्ण पाटील करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !