चोरीच्या सहा दुचाकींसह मध्यप्रदेशातील चोरटे जळगाव एमआयडीसी पोलिसांच्या जाळ्यात
एमआयडीसी पोलिसांची दमदार कामगिरी : पावणेदोन लाखांच्या दुचाकी जप्त
Thieves in Madhya Pradesh with six stolen bikes in the net of Jalgaon MIDC police जळगाव : मध्यप्रदेशातील अट्टल दुचाकी चोरट्यांना जळगावातील एमआयडीसी पोलिसांनी अटक करीत त्यांच्याकडून एक लाख 75 हजार रुपये किंमतीच्या सहा चोरीच्या दुचाकी जप्त केल्या आहेत. अनोप धनसिंग कलम (कोरकू, 18, सुकवी थाना, खालवा, जिल्हा खंडवा, मध्यप्रदेश) व अंकीत सुकलाल ठाकुर (कोरकू, 22, अरविंद नगर, मुसाखेडी इंदौर, मध्यप्रदेश) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
गोपनीय माहितीवरून कारवाई
एमआयडीसी पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना मध्यप्रदेशातील दुचाकी चोरट्यांबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला निर्देश दिले. आरोपींना खंडवा कारागृहातून ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी एमआयडीसी हद्दीतून सहा मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिल्यानंतर एक लाख 85 हजार रुपये किंमतीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या.


यांनी केली कारवाई
ही कारवाई जळगाव पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, एमआयडीसी पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे, दत्तात्रय पोटे, अतुल वंजारी, गणेश शिरसाळे, गफुर तडवी, सुनील सोनार, विकास सातदिवे, योगेश बारी, छगन तायडे आदींच्या पथकाने केली.