नंदुरबार शहरात 25 वर्षीय तरुणाचा चाकूचे वार करीत खून


A 25-year-old youth was stabbed to death in Nandurbar city नंदुरबार : शहरातील गोल्डन सिटी वसाहतीमागे 25 वर्षीय तरुणाचा चाकूने वार करून तसेब दगडाने ठेवून निर्घृण खून करण्यात आला. ही घटना बुधवारी मध्यरात्री घडली, धीरज उर्फ महेंद्र दिलीप भोई (25) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही मात्र पोलिसांकडून कसून तपासाला सुरूवात झाली आहे.

पोलिसांची घटनास्थळी भेट
खुनाची माहिती कळताच पोलीस अधिकारी घटनास्थळी जाऊन दाखल झाली. मारेकर्‍यांच्या शोधासाठी लगेच तपास पथके रवाना करण्यात आली. या गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक राहुल कुमार पवार करत आहेत.

मध्यरात्री खुनाचा प्रकार उघड
धीरज भोई हा तरुण दुपारी घराबाहेर पडल्यानंतर सायंकाळपर्यंत घरी न परतल्याने मोठा भाऊ कृष्णा याने त्याला सायंकाळी जेवणासाठी फोन केला असता मी थोड्या वेळात घरी येत असल्याचे सांगितले. मात्र तरीही तो घरी न आल्याने पुन्हा फोन लावला, फोन स्वोच ऑफ आल्याने कुटुंबीयांनी त्याचा शोष घेतला. तेव्हा काही जगांनी धीरजचा मृतदेह गोल्डन सिटी बसाहती मागे टेकडीजवळ असल्याची माहिती देताच कुटूंबियांना धक्का बसला.


कॉपी करू नका.