गॅस सिलिंडरच्या स्फोटानंतर आग : अमळनेर तालुक्यात कुटूंब प्रमुखाचा मृत्यू
Fire after explosion of gas cylinder : Death of family head in Amalner taluka अमळनेर : गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्यानंतर लागलेल्या आगीत घरातील कर्त्या पुरुषाचा होरपळून मृत्यू झाला. ही घटना तालुक्यातील पिंपळी रविवारी सायंकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास घडली. दिलीप नामदेव पाटील असे मयताचे नाव आहे.
गॅस गळतीने लागली आग
पाटील यांच्या पत्नी रविवारी सायंकाळी दिवा लावत असतानाच घरात अचानक आग लागली आणि त्यातच गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. घराचे लाकडी छत आणि घरात कापूस असल्याने सर्व घरातच आग पसरली. दिलीप यांच्या पत्नी, मुलगा आणि नात तातडीने घराबाहेर पळाले मात्र दिलीप यांना चक्कर आल्याने ते घरात अडकून पडले. ग्रामस्थ मिळेल त्या साधनांनी आग आटोक्यात आणून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करीत होते. बर्याच प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली मात्र तोपर्यंत त्यांचा होरपळून मृत्यू झाला. आगीत पाटील यांच्या पत्नी संगीता, मुलगा विकी व नात खुशी हे देखील जखमी झाले.

