चाळीसगाव तालुक्यात भीषण अपघात : मालेगावच्या तवेरा चालकासह दोघे ठार

14 प्रवासी जखमी : दोघा गंभीर रुग्णांना धुळ्यात हलवले


Fatal accident in Chalisgaon taluk: Malegaon Tavera driver and two killed चाळीसगाव : भरधाव बस चालकाने तवेरा वाहनाला दिलेल्या धडकेनंतर झालेल्या भीषण अपघातात तवेरा चालकासह दोघे जागीच ठार झाले तर 14 प्रवासी जखमी झाले. हा अपघात देवळी गावानजीक मंगळवार, 26 मार्च रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास घडला. काही जखमींवर चाळीसगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर दोन गंभीर रुग्णांना धुळे तर एकाला मालेगाव येथे हलवण्यात आले आहे. शरद वासु माळी (32) व शेख रेहमान शेख बाबू (40, दोन्ही रा.मालेगाव) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत.

जागीच दोघे ठार : आठ प्रवासी जखमी
मालेगाव आगाराची बस क्रमांक (एम.एच.14 बी.टी.0375) ही मंगळवारी दुपारी चाळीसगाववरून मालेगावकडे सुसाट वेगाने जात असताना देवळीजवळील वळणावर तवेरा क्रमांक (एम.एच.04 सी.टी.2492) वर समोरून आदळली. बसची धडक एव्हढी जोरदार होती की, तवेरा वाहनाचा चक्काचूर झाला. अपघातात तवेरा चालकासह एका तरुणाचा मृत्यू झाला. या अपघातात तवेरा वाहनातील 9 तर बसमधील पाच प्रवासी जखमी झाले. त्यातील काही रुग्णांवर चाळीसगाव येथे उपचार सुरू आहेत तर अन्य दोघांना धुळे सामान्य रुग्णालयात व एकाला मालेगाव येथे हलवण्यात आल्याचे सांगण्यात आले.



बस चालकाचा शोध
मेहुणबारे पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक संदीप परदेशी व सहकार्‍यांनी अपघाताच्या काही क्षणात धाव घेत मदतकार्य सुरू केले. दरम्यान, तवेरा वाहनात 11 प्रवासी होते तर बसमध्ये 26 प्रवासी असल्याची माहिती सूत्रांनी दिली. बसमधील काही प्रवाशांना किरकोळ ईजा झाल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, बसचालक मनोहर अभिमन देसले याचा शोध सुरू असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !