ट्रकच्या धडकेत पारोळ्यातील दुचाकीस्वार ठार


A bike rider in Parola was killed in a collision with a truck अमळनेर : अज्ञात ट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार तर एकजण गंभीर जखमी झाला होता. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अमोल दिलीप अहिरे (म्हसदी धुळे, ह.मु.पारोळा) असे मयत तरूणाचे नाव आहे. अमळनेर ते चोपडा रोडवरील रेल्वे पुलाजवळ हा अपघात सोमवारी दुपारी घडला.

तरुण जागीच ठार
अमोल अहिरे हा तरुण सोमवार, 25 मार्च रोजी दुपारी 2 वाजता दुचाकी क्रमांक (एम.एच.19 ई.जे.6578) ने मित्र देवेश लक्ष्मण सोनवणे (अमळनेर) सोबत अमळनेरकडून चोपडा येथे कामासाठी जात असताना अमळनेर ते चोपडा रस्त्यावरील रेल्वे पुलाजवळ समोरून येणारी अज्ञात मालट्रक ने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात अमोल अहिरे याचा जागीच मृत्यू झाला तर सोबत असलेला देवेश सोनवणे हा गंभीररित्या जखमी झाला.



अपघात घडल्यानंतर मालट्रक चालक हा ट्रक घेवून पसार झाला. जखमीस अमळनेर ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी सायंकाळी सहा वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात ट्रकवरील अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार सुनील पाटील करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !