लसणाआड अफू वाहतुकीचा उधळला डाव : 13 लाखांच्या अफूसह संशयीत शिरपूर तालुका पोलिसांच्या जाळ्यात


Opium traffic busted in Lasna : Suspect with opium worth 13 lakhs caught by Shirpur taluka police शिरपूर : शिरपूर तालुका पोलिसांनी मानवी मेंदूला गुंगी येणार्‍या प्रतिबंधीत अफूची वाहतूक रोखत मध्यप्रदेशातील दोघांना बेड्या ठोकल्या. विशेष म्हणजे आरोपींनी पुष्पा स्टाईल वाहनात विशेष कप्पा बनवून त्यात अफू लपवला होता व संशय न येण्यासाठी वाहनात लसणाचे पोते रचण्यात आले होते मात्र गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपी चालक व वाहकाचे मनसुबे उधळले.कृपालसिंग उमेदसिंग राजपूरोहित (35, डोली पाचपदरी, जि.बारमेर, राजस्थान, ह.मु.नाकोडा स्वीट, येवला, जि.नाशिक) व रघुनाथसिंग कचरूसिंग गुजर (21, आनेडाता, सोहासरा, जि.मन्सूर, मध्यप्रदेश) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

गोपनीय माहितवीरून कारवाई
मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात प्रतिबंधीत असलेल्या अफूची वाहतूक होत असल्याची माहिती सांगवी पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला कारवाईचे निर्देश दिले. पळासनेर चेकपोस्टवर नाकाबंदी लावल्यानंतर वाहन क्रमांक (एम.पी.13 जी.बी.3525) आल्यानंतर त्याची तपासणी केल्यानंतर विशेष कप्प्यात पाच लाख 76 हजार रुपये किंमतीची 72 किलो वजनाचे सुकलेल्या अफूची बोंडे व सात लाख रुपये किंमतीचे दोन किलो अफीम तसेच पाच लाख रुपये किंमतीचे बोलेरा वाहन मिळून एकूण 12 लाख 75 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका निरीक्षक श्रीराम पवार, बाळासाहेब वाघ, रफिक मुल्ला, संदीप ठाकरे, मंगेश मोरे, चत्तरसिंग खसावद, दिनेश सोनवणे, शिवाजी वसावे, कृष्णा पावरा, वाला पुरोहित, दिनकर पवार, रोहिदास पावरा, जयेश मोरे, चालक मनोज पाटील आदींच्या पथकाने केली.


कॉपी करू नका.