यावलच्या विस्तारित भागात 39 वर्षीय महिलेचा विनयभंग : एकाविरोधात गुन्हा


39-year-old woman molested in extended area of ​​Yaval : Crime against one यावल : शहरातील फैजपूर रस्त्यालगत असलेल्या विस्तारीत भागातील 39 वर्षीय महिलेचा एकाने सतत पाठलाग केला व रस्त्यात थांबवून तिचा हात पकडून तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. मला कॉल कर नाहीतर तुला ठार मारेल व तुझ्या मुलीचे लग्न होवु देणार नाही, अशी धमकी दिली. याप्रकरणी यावल पोलिसात एकाविरूध्द विनयभंग सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

रस्ता अडवत केला विनयभंग
शहरात फैजपूर रस्त्यालगत विस्तारित भागातील रहिवाशी 39 वर्षीय विवाहितेचा बिस्मिल्ला रहेमान तडवी हा सतत पाठलाग करत होता. या महिलेला तो सतत त्रास देत होता. दरम्यान शुक्रवारी त्याने सदर महिलेचा पाठलाग केला व रस्त्यात थांबवून तिचा हात पकडून तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. तू मला रात्री एक वाजता कॉल कर जर तु मला कॉल केला नाही तर तुला जिवंत सोडणार नाही व तुझ्या मुलीचे लग्न देखील होऊ देणार नाही. अशी त्याने महिलेला धमकी दिली. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात सदर महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून बिस्मिल्ला तडवी याच्याविरुद्ध विनयभंग सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे करीत आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !