यावलला अपघातात अवैध वाळू वाहतूक करणार्या डंपरचे दोन तुकडे
Two pieces of dumper transporting illegal sand in Yavala accident यावल : जिल्ह्यात अवैध गौण खनिज तसेच वाळू वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असून वाळू वाहून नेणार्या भरधाव डंपरचे अपघातात दोन तुकडे झाल्याची घटना यावल ते फैजपूरच्या दरम्यान घडली. यावल-फैजपूर रोडवर सकाळी सुसाट वेगाने धावणार्या अवैध गौण खनिजाची वाहतूक करणार्या डंपरचा भीभषण अपघात झाला. या अपघातात डंपरचे दोन तुकडे झाले तर सुदैवाने जिवीतहानी टळली.
अवैध वाळू वाहतूक ऐरणीवर
यावल तालुक्यात मोठ्या प्रमाणावर रात्रीच्या वेळीस भरधाव वेगाने धावणार्या डंपरद्वारे वा ट्रॅक्टरव्दारे अवैध वाळूची वाहतूक सुरू आहे. त्यातच यावल-फैजपूर मार्गावरील ढाके वकील यांच्या शेताजवळच्या पुढील वळणावर रविवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास यावल ते चितोडा रस्त्यादरम्यान वाळूची वाहतूक करणार्या एका चारचाकी डंपरचा भीषण अपघात झाला. या अपघातात डंपरचा वेग इतका होता की त्या डंपरचे दोन तुकडे झाले. या मार्गावरील सकाळच्या सुमारास मोठ्या संख्येत अनेक नागरिक वॉकिंग करण्यासाठी जातात मात्र सुदैवाने अपघात या ठिकाणी कुणीही वॉकिंगला जाणारे पादचारी नसल्याने मोठी जिवितहानी टळली.

