भीषण अपघातात नवरदेवासह तिघे ठार
Three killed including husband in horrific accident बीड : भावी नवरदेवाच्या दुचाकीला एस.टी.बसने धडक दिल्याने झालेल्या भीषयण अपघातात नवरदेवासह बहिण व भाचीचा मृत्यू ओढवला. हा अपघात अंबाजोगाई जवळील वाघाळा पाटीजवळ रात्री झाला.
बसच्या धडकेने तिघे ठार
लातूर जिल्ह्यातील बिटरगाव तांडा (ता.रेणापूर) येथील सेवालाल पंडित राठोड (21) या तरुणाचा येत्या 28 एप्रिल रोजी विवाह होणार होता. लग्नाचा बस्ता बांधण्यासाठी सेवालाल त्याची राडी तांडा (ता. अंबाजोगाई) येथील बहीणदीपाली सुनील जाधव (20) आणि एक वर्षाची भाची त्रिशा यांना घेऊन अंबाजोगाईला आला होता. लग्नाचा बस्ता बांधून बहिण आणि भाचीला घेऊन सेवालाल सायंकाळी दुचाकीवरून गावाकडे परत निघाला असता वाघाळा पाटीजवळ आले असता समोरून येणार्या लातूर – छत्रपती संभाजीनगर बसने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने तिघे ठार झाले. अपघातानंतर नातेवाईकांनी मोठा आक्रोश केला.

