धुळ्यात पोलीस अधिकारी फैलावर : लाचेच्या तक्रारी आल्यास कठोर कारवाई : जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे

जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरेंचा इशारा : पारदर्शक कामाच्या सूचना


धुळे : धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या निरीक्षकांसह दोघा कर्मचार्‍यांना हद्दपारीची कारवाई न करण्यासाठी दिड लाखांची लाच घेताना धुळे एसीबीने दोन दिवसांपूर्वी अटक केली होती. लाच प्रकरणामुळे पोलीस दलाची झालेली बदनामी पाहता धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांनी बुधवारी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकार्‍यांची बैठक घेतली. यात पोलीस दलाची प्रतिमा मलीन होणार नाही तसेच कुठल्याही प्रलोभनांना बळी पडून, कोणत्याही प्रकारचे बेकायदेशीर कृत्य करीत कुणीही अधिकारी लाच मागून भ्रष्टाचार करणार नाही, अशी तंबी अधीक्षकांनी दिली.

तक्रारी आल्यास कठोर कारवाई
धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणाले की, कुणीही अधिकारी लाच मागून किंवा देवून भ्रष्टाचार करणार नाही. दैनंदिन कर्तव्य पार पाडत असतांना कोणत्याही प्रकारे गटबाजी, श्रेयवाद व वर्चस्व वादाचे प्रकार करे नयेत. तसे आढळून आल्यास त्याची गंभीर दखल घेवून कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिला. त्याशिवाय दप्तर दिरंगाई करुन कामकाजात हलगर्जीपणा न करण्यासह अशा प्रकारच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस ठाणे स व इतर कार्यालयांमध्ये नेमणुकीस असलेले पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या गुन्ह्यांच्या कामकाजावर पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व त्यावरील सर्व नियंत्रक व पर्यवेक्षक अधिकार्‍यांनी योग्य नियंत्रण ठेवणे आवश्यक असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणाले. अशा घटनांबाबत वरिष्ठांना माहिती मिळाल्यास किंवा तक्रार प्राप्त झाल्यास त्याची गंभीर दखल घेवून कुणालाही पाठीशी न घालता संबंधितांवर कठोर कारवाईचा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिला.


कॉपी करू नका.