रावेर तालुक्यात चार एकर गांजा शेतीवर पोलिसांनी फिरवला कारवाईचा बुलडोजर


In Raver taluka, the police moved a bulldozer on a four-acre ganja farm रावेर : रावेर पोलिसांनी गोपनीय माहितीवरून रावेर तालुक्यातील लालमाती सहस्त्रलिंग जवळ चार एकरवरील गांजा पीक निष्ट केले आहे. याप्रकरणी रावेर पोलिसांनी बुधवारी रात्री उशिराने गुन्हा नोंद करण्यात आला.

गोपनीय माहितीवरून कारवाई
रावेर तालुक्यातील पालजवळ असलेल्या लालमाती सहस्त्रलिंग शिवारामध्ये चार एकरमध्ये गांजाची शेती होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी छापा टाकला. ओल्या गांजाची झाडे जप्त करण्यात आली असून बुवारी रात्री उशिरापर्यंत कारवाई सुरूच असल्याने नेमका कारवाईचा आकडा अद्याप समोर आलेला नाही.



यापर्वूी स्थानिक गुन्हे शाखेने एका ठिकाणी छापा टाकून मक्याच्या शेतातून गांजाची झाडे जप्त केली होती. कारवाईची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अन्नपूर्णा सिंग, तहसीलदार बंडू कापसे यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस निरीक्षक डॉ.विशाल जयस्वाल हे पथकासह रात्री उशिरापर्यंत घटनास्थळी थांबून होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !