गारबर्डी धरणात बुडून सावदा येथील 15 वर्षीय मुलाचा मृत्यू : ईदच्या दिवशीच दुर्घटना


Death of 15-year-old boy from Sawada after drowning in Garbardi Dam : Accident on Eid day itself सावदा : गारबर्डी धरणात बुडाल्याने सावदा शहरातील 15 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. शे.ताबिश शे.रमजान मोमीन (15, ख्वाजानगर, सावदा) असे मयत मुलाचे नाव आहे. ऐन रमजान ईदच्या दिवशी गुरुवारी दुर्घटना घडल्याने शहरातून हळहळ व्यक्त करण्यात आली.

सावदा शहरात हळहळ
शेख ताबिश शेख रमजान मोमीन हा आपल्या चार ते पाच मित्रांसोबत गुरुवारी सकाळच्या ईदगाहवरील सामूहिक नमाज पठण झाल्यानंतर गारबर्डी धरणावर फिरायला गेला. तेथे पाय घसरून पडल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. एकीकडे रमजान ईदचा उत्साह असताना शेख ताबिश यांच्या मृत्यूच्या बातमीने ख्वॉजानगरात धक्का बसला. तो दहावीच्या वर्गात शिक्षण घेतल्याची माहिती मिळाली. मयत मुलाच्या पश्चात एक मोठा आणि एक लहान भाऊ असा परिवार आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !