कोरपावलीत जुगार अड्ड्यावर धाड : अडीच लाखांचा मुद्देमाल हस्तगत


Raid on gambling den in Korpavali : Cash worth 2.5 lakh seized  यावल : यावल तालुक्यातील कोरपावली येथे फैजपूर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या सहायक पोलीस अधीक्षक अन्नपुर्णा सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने झन्ना-मन्ना जुगार खेळतांना चार जणांवर कार्यवाही केली. दुचाकी वाहन, मोबाईल फोन व रोख रक्कम असा एकूण अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
कोरपावली, ता.यावल या गावात गुरूवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास जुगार अड्डा सुरू असल्याची गोपनीय माहिती फैजपूरच्या विभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या सहायक पोलीस अधीक्षक अन्नपुर्णा सिंग यांना मिळाली होती. त्यांच्या आदेशाने यावलचे पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर, सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे, गणेश मनुरे, भरत कोळी, अनिल साळुंके यांच्यासह पोलीस कर्मचारी यांच्या पथकाने कार्यवाही केली.



संशयीतांविरोधात गुन्हा
कोरपावली शेत-शिवारातील अजीज शमशेर तडवी यांच्या मक्याच्या शेतात कमलेश आत्माराम पाटील, अजीज शमशेर तडवी, हुसैन खान अख्तर खान व तुषार दिलीप तायडे हे चौघे स्वतःच्या फायद्यासाठी गैरकायद्याने झन्नामन्ना हा हारजीतचा पत्ता जुगार खेळतांना मिळून आला. तेथून चार दुचाकी, दोन मोबाईल व 20 हजारांची रोकड असा एकूण अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी यावल पोलिसात हवालदार गणेश मनुरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चार जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार विजय पाचपोळ करीत आहेे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !