नातवाच्या जावळाच्या कार्यक्रमासाठी धुळ्यात आलेल्या यावलमधील वयोवृद्धाचा हृदयविकाराने मृत्यू

0

यावल : शहरातील मेनरोडवरील रहिवासी 53 वर्षीय इसम हे मंगळवारी आपल्या नातवाच्या जावळाच्या कार्यक्रमाला धुळे येथे गेले होते. दरम्यान तेथून परतत असतांना धुळे येथील बसस्थानकाजवळ दुपारी त्यांचा ह्रदय विकाराने मृत्यू झाला. याबाबत धुळे येथे नोंद करीत यावल येथे रात्री त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

हृदयविकाराने धुळ्यात मृत्यू
शहरातील मेन रोडावरील वैशाली जनरल स्टोअर्सचे मालक अजय प्रभाकर रणधीरे (53) हे मंगळवारी धुळे येथे त्यांच्या नातवाच्या जावळासाठी गेले होते. कार्यक्रम आटोपल्यावर दुपारी ते परतीच्या मार्गावर येण्याकरीता धुळे बसस्थानकात जात होते. बसस्थानकाजवळ त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला व यात त्यांचा मृत्यू झाला. धुळे येथे याबाबतची नोंद करीत यावल येथे रात्री त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. ते हर्षल अजय रणधीरे यांचे वडील होत.


कॉपी करू नका.