भुसावळातील भीमा कॉलनीत 41 हजारांची घरफोडी : एकाविरोधात गुन्हा

0

Burglary of 41 thousand in Bhima Colony in Bhusawal :  Crime against one भुसावळ : भुसावळ शहरातील आरपीडी रोडवरील भीमा कॉलनीत एकाने घरफोडी करीत 41 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना 6 रोजी दिवसभरात घडली. याप्रकरणी रवी भालेराव (नाव गाव पूर्ण माहित नाही) याच्याविरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

भुसावळात चोरट्यांची एक्स्प्रेस सुसाट
मुकेशी देवी ग्यारशालाल मीना (45, भीमा कॉलनी, भुसावळ) यांच्या फिर्यादीनुसार, संशयीत आरोपी रवी भालेराव याने फिर्यादीच्या राहत्या घरातील प्लॅस्टीकच्या डब्यातील 10 ग्रॅमची सोन्याची अंगठी, पाच ग्रॅमचे सोन्याचे पेंडल, पाचशे रुपये किंमतीचे घड्याळ, 950 रुपये किंमतीची रोकड असा एकूण 41 हजार 500 रुपये किंमतीचा मुद्देमाल लंपास केला. तपास नाईक अब्दुल रज्जाक अब्दुल रहिम करीत आहेत.


कॉपी करू नका.