भुसावळातील टिंबर मार्केटमधून अवघ्या 15 मिनिटात दुचाकी लांबवली

0

The bike was extended in just 15 minutes from the timber market in Bhusawal भुसावळ  : शहरात दुचाकी चोरींचे सत्र कायम आहे. कामानिमित्त शहरातील टिंबर मार्केटमध्ये आलेल्या मेडिकल रीप्रेझेन्टीव्हची 30 हजार रुपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लांबवली.

दुचाकी चोर्‍या वाढल्या
1 एप्रिल रोजी दुपारी दोन ते सव्वादोन दरम्यान ही घटना घडली. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. राहुल हरी चौधरी (43, प्रल्हाद नगर, गुजर कॉलनी, भुसावळ) हे व्यवसायाने एम.आर.आहेत. सोमवार, 1 रोजी दुपारी ते दोन वाजेच्या सुमारास ते टिंबर मार्केटमध्ये आल्यानंतर त्यांनी दुचाकी पार्क केली मात्र अवघ्या 15 मिनिटात त्यांची दुचाकी लांबवण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक गजानन पडघण यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार महेश चौधरी करीत आहेत.


कॉपी करू नका.