जागर मतदानाचा, उत्सव लोकशाहीचा : भालोद महाविद्यालयात कार्यक्रम

0

Jagar Voting, Celebration of Democracy : Program at Bhalod College भालोद : सेकंडरी एज्युकेशन सोसायटी संचलित कला व विज्ञान महाविद्यालय, भालोद येथे ‘जागर मतदानाचा उत्सव लोकशाहीचा’ या अभिनव कार्यक्रमाचे आयोजन मतदार जागृतीच्या निमित्ताने करण्यात आले. भारत निवडणूक आयोग, महाराष्ट्र निवडणूक आयोग, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव, शिक्षण सहसंचालक कार्यालय, जळगाव यांच्या सूचनेवरून मतदारांमध्ये मतदान करण्याची प्रवृत्ती अधिक वाढण्यासाठी ‘ताबूला रसा; या कार्यक्रमांतर्गत या विशेष एक दिवसीय लोकशाही उत्सवाचे आयोजन महाविद्यालयात करण्यात आले.

विविध कार्यक्रमांचे आयोजन
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.किशोर कोल्हे यांच्याहस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटरन झाले. जिल्हाधिकारी यांनी केलेल्या आवाहनानुसार शहरी उदासीनतेवर मात करण्यासाठी समाजातील वंचित घटकांना मतदानासाठी प्रेरित करण्यासाठी जागरूक नागरिक होऊया, अभिमानाने मत देऊया, महिला मतदारांना प्रेरित करण्यासाठी जे हात मत देतात, ते जगावर राज्य करतात ाणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ताबूला रसा ब्लँक स्लेट या थीम वर आधारित विविध प्रकारचे कार्यक्रम महाविद्यालयात आयोजित करण्यात आले. विद्यापीठ आणि महाविद्यालयीन स्तरावर नव मतदारांसाठी ताबुला रसा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमांतर्गत 2024 या वर्षी मतदान करणार्‍या नव मतदारांना मतदानाविषयी त्यांच्या मनातील भावना, लेख, कविता, स्लोगन, पत्र, पेंटिंग, पोस्टर यांच्या माध्यमातून प्रकट करण्यासाठी ‘ताबूला रसा’ हा कार्यक्रम राबवण्यात आला. या कार्यक्रमांतर्गत एक सेल्फी पॉईंट मतदान जागृती साठी तयार करण्यात आला होता. देशाच्या सर्वांगीण विकासासाठी व सुरक्षिततेसाठी.. चला आपण मतदान करूया.., जागरूक नागरिक होऊया …अभिमानाने मत देऊया… अशा प्रकारच्या स्लोगन लिहिलेल्या सेल्फी पॉईंटवर विद्यार्थ्यांनी फोटो काढले व ते व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस्ला आणि डीपीला लावले. फेसबुक इंस्टाग्राम व्हॉट्सअ‍ॅप या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर ते अपलोड केले. या निमित्ताने साकळी, ता.यावल येथील कलाकार चंद्रकांत पद्माकर नेवे यांनी मतदान जागृतीच्या निमित्ताने एक सुंदर अशी मोठी रांगोळी रेखाटली. मतदार यादीमध्ये नाव शोधण्यासाठी एक बारकोड महाविद्यालयामध्ये दर्शनी भागात लावण्यात आला. या बारकोडला आपल्या मोबाईलमधून स्कॅन केल्यावर मतदार यादीचा भाग क्रमांक आणि अनुक्रमांक लगेचच शोधता येत होता. अनेक विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला तसेच मतदान जागृती व्हावी यासाठी मी मतदान करणार आहे, असा संकल्प करून एका व्हाईट बोर्डवर स्वाक्षरी मोहिम राबवण्यात आली. जवळपास 150 विद्यार्थ्यांनी या स्वाक्षरी मोहिमेमध्ये सहभाग घेतला.

मतदानाचा टक्का वाढण्यासाठी आवाहन
नोडल ऑफिसर प्रा.डॉ.सुनील नेवे यांनी मतदानाची टक्केवारी वाढावी याकरीता समाजात जाऊन प्रबोधन करावे, असे आवाहन केले. यावेळी एकूण 68 विद्यार्थ्यांनी एथ्री साईजच्या ड्रॉइंग पेपरवर पेंटिंग, स्लोगन, पत्र, भाषण व आपल्या मनातील संकल्पना उतरवल्या. विशेष म्हणजे महाविद्यालयातील शिक्षक वर्ग आणि शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांनी सुद्धा ड्रॉइंग पेपरवर आपल्या मनातील विचार उतरवले.

यांची होती उपस्थिती
याप्रसंगी प्राचार्य डॉ.किशोर कोल्हे, नोडल ऑफिसर प्रा.डॉ.सुनील नेवे, प्रा.डॉ.अजय कोल्हे, डॉ.दिगंबर खोब्रागडे, डॉ.गणेश चौधरी, डॉ.दिनेश पाटील, प्रा.राकेश चौधरी, प्रा.राजेंद्र इंगळे, प्रा.काशीनाथ पाटील, प्रा.डॉ.मोहिनी तायडे, प्रा.डॉ.आशुतोष वर्डीकर, प्रा.हेमंत इंगळे, प्रा.चंद्रकांत वानखेडे, प्रा.दिलीप चौधरी, वरीष्ठ पर्यवेक्षक प्रा.हेमंत बाविस्कर, प्रा.सतीश वैष्णव, प्रा.भावना प्रजापती, प्रा.फाल्गुनी राणे, प्रा.हेमलता कोल्हे, मोहिनी चौधरी, कल्याण चौधरी, रूपम बेंडाळे, किशोर चौधरी, दिलीप इंगळे, मुबारक तडवी, बाळकृष्ण चौधरी, तुळशीराम पाटील, चंद्रकांत लोखंडे यांच्यासह विद्यार्थी अ‍ॅम्बेसेडर निलेश मिस्त्री, विद्यार्थिनी अ‍ॅम्बेसेडर नेहा बर्डे यासह अनेक विद्यार्थी उपस्थित होते.


कॉपी करू नका.