निवृत्तीच्या उंबरठ्यावर उभा असतांना मिळालेला हा पहिलाच पुरस्कार लाख मोलाचा : पोलीस उपनिरीक्षक आसीफखान

भुसावळात ‘एम्प्लॉयी ऑफ द मंथ’ पुरस्काराने पोलीस कर्मचार्‍यांचा सनमन

0

On the verge of retirement, this is the first award worth lakhs : Sub-Inspector of Police Asif Khan भुसावळ :गेल्या 40 वर्षांपासून पोलीस खात्यात सेवा करीत आहे, मात्र माझ्या कामाची दखल घेत मला जो पुरस्कार मिळाला तो निवृत्तीच्या उंबरठ्यावर उभा असतांना मिळालेला हा आयुष्यातील पहिलाच पुरस्कार माझ्यासाठी लाख मोलाचा आहे, अशी भावना येथील शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक आसीफखान युसूफ खान यांनी व्यक्त केल्या. भुसावळातील डीवायएसपी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात त्यांना ‘एम्प्लॉयी ऑफ द मंथ’ या पुरस्काराने डीवायएसपी कृष्णात पिंगळे यांच्याहस्ते सन्मान करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते.

पोलीस उपअधीक्षकांच्या संकल्पनेतून कार्यक्रम
प्रत्येक पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यांची निर्गती करण्यासाठी तसेच मोटार व्हेईकल अ‍ॅक्टनुसार अधिकाधिक केसेससह वरीष्ठ व स्थानिक अर्जांची निर्गती करणार्‍या पाच पोलीस कर्मचार्‍यांचा ‘एम्प्लॉयी ऑफ द मंथ’ या पुरस्काराने डीवायएसपी कृष्णात पिंगळे यांच्याहस्ते दर महिन्याला सन्मान केला जातो. डीवायएसपी कृष्णात पिंगळे यांनी येथे पदभार स्विकारल्यापासून उत्कृष्ट काम करणार्‍या विभागातील पाच कर्मचार्‍यांना काम केल्याच्या गुणवत्तेवर ‘एम्प्लॉयी ऑफ द मंथ’ पुरस्कार देण्याचा स्तुत्य उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमामुळे कर्मचार्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण असून त्यांच्या कामाप्रती अधिक गोडीदेखील वाढली आहे. अन्य कर्मचार्‍यांनाही पुढच्या महिन्यात आपणासही हा सन्मान मिळेल असे वाटू लागते. यामुळे कामात गती व गुन्हे कमी होण्याचे प्रमाण वाढत आहे.

प्रामाणिकपणे काम केल्याचे मिळाले फळ
शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक आसीफखान युसूफ खान यांनाही पुरस्कार मिळाला. त्यांना गेल्या 40 वर्षात पोलीस सेवेत असतांना हा पहिलाच पुसस्कार मिळाला. निवृत्तीच्या उंबरठ्यावर असतांना मिळालेला हा पुरस्कार माझ्यासाठी लाख मोलाचा आहे, माझ्या कामाची दखल घेतली गेली याचा आनंद आहे, असे खान यांनी त्यांच्या मनोगतात सांगितले. यावेळी डीवायएसपी पिंगळे यांनी मनोगत व्यक्त करून पोलीस सेवा म्हणजे ही देश सेवा आहे. गोर-गरीबांना आपण मिळवून देत असलेला न्याय, यातून त्यांना मिळत असलेला दिलासा हा जीवन सुखद करणारा आहे. असे सांगितले. प्रामाणिकपणे काम केल्यास त्याचे फळ नक्कीच मिळते, असे त्यांनी सांगितले. यावेळी शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप रणदिवे, निरीक्षक गजानन पडघन, निरीक्षक बबन जगताप, नशिराबादचे सहायक निरीक्षक रामेश्वर मोताळे, शहर वाहतूक शाखेच्या सहायक निरीक्षक रुपाली चव्हाण आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

यांचा झाला गौरव
पोलीस प्रशासनातर्फे उत्कृष्ठ काम करणार्‍या कर्मचार्‍यांना ‘एम्प्लॉयी ऑफ द मंथ’ या पुरस्काराने डीवायएसपी कृष्णात पिंगळे यांच्याहस्ते सन्मानीत करण्यात आले. यात शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक आसीफ खान युसूफ खान, बाजारपेठ पोलीस ठाण्याचे प्रशांत सोनार, तालुका पोलीस ठाण्याचे प्रेमचंद सकाळे, शहर वाहतूक शाखेचे प्रशांत चव्हाण, नशिराबादचे पोलीस उपनिरीक्षक अलीयारखान नसरउल्ला खान यांचा समावेश आहे.


कॉपी करू नका.