जळगावात केमिकल फॅक्टरीत स्फोट : मृतांची संख्या पोहोचली चारवर

0

Explosion in chemical factory in Jalgaon : Death toll reaches four जळगाव : जळगावच्या मोरया ग्लोबल लिमिटेड या कंपनीत गुरुवारी झालेल्या स्फोटानंतर उपचार सुरू असलेल्या दोन कामगारांचा मृत्यू ओढवला आहे. या घटनेत आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेप्रकरणी कंपनी मालक, व्यवस्थापनाविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. कंपनीच्या मालकासह व्यवस्थापकाला अटक करण्यात आली. दरम्या, संशयीतांना न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. यातील प्रशासकीय अधिकारी मात्र पसार झाला आहे.

दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू
जळगाव एमआयडीसीतील डब्ल्यू सेक्टरमधील मोरया ग्लोबल लिमिटेड कंपनीत आग लागल्याची घटना बुधवार, 17 रोजी सकाळी घडली होती. अथक परिश्रमानंतर ही आग आटोक्यात आली. आगीत होरपळलेल्या कामगारांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, खासगी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. यातील दोन कामगारांचा मृत्यू झाला होता. आज उपचारा दरम्यान दोन कामगारांचा मृत्यू झाला किशोर दत्तात्रय चौधरी (रेणुकानगर, रामेश्वर कॉलनी) व दीपक वामन सुहा (विठोबानगर) असे मयतांची नावे आहेत.

कंपनी मालकासह व्यवस्थापकाला अटक
कंपनीतील स्फोटप्रकरणी कपिल राजेंद्र पाटील यांच्या फिर्यादीवरून कंपनी मालक अरुण निंबाळकर, व्यवस्थापक लोमेश सुकलाल रायगडे, प्रशासकीय अधिकारी अनिल गुलाब पवार या तिघांविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात सदोष मनुष्य वधासह कलम 225, 283, 285, 337, 338 यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात कंपनी मालकासह व्यवस्थापकाला अटक करण्यात आली असुन दोघांना न्यायालयाने दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.

मुलांचे यश पाहण्यापुर्वीच किशोर चौधरींवर काळाची झडप !
एमआयडीसीतील कंपनीत स्फोट झाल्यानंतर आज दुसर्‍या दिवशी किशोर चौधरी यांची उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली. किशोर चौधरी हा गेल्या दोन ते तीन वर्षापासून कामाले होते तर त्यांच्या पत्नी देखील याच कंपनीत काम करीत आहेत. किशोर व त्यांच्या पत्नी दोन्ही याच कंपनीत काम करून कुटुंबाचा गाडा ओढत होते. त्यांना दोन मुले असुन ते स्पर्धा परिक्षांची तयारी करत आहे. मुलांच्या शिक्षणाला कुठली ही अडचण येवू नये म्हणून ते दोन्ही कंपनीत काम करत होते. मुले स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण करावीत, असे स्वप्न मनी बाळगुण जीवापाड मेहनत करणार्‍या किशोरने पैसे न खर्च करता आज ही पत्र्याच्या घरात राहत होते. मुलांचे यश पाहण्यापुर्वीच त्यांच्यावर काळाने झडप घातली.

घराचा ‘दीपक’ हिरावला !
दीपक साहू या कर्मचार्‍यावर रूग्णालयात उपचार सुरू होते. पुढील उपचारासाठी मुंबई येथे हलविण्यात आले. मात्र उपचारासाठी घेवून जात असतांना नाशिक जवळच त्यांची प्राणज्योत मालावली. दीपक साहु हा घरातील एकुलता एक व कष्टाळू मुलगा होता. त्याच्या परिवारात आई, वडील व दोन बहिनी आहे. एक बहिण कौटुंबिक वादामुळे माहेरीच राहत होत्या. संपुर्ण कुटूंबाची जबाबदारी एकुलत्या एक दिपकवर होती. मात्र दिपकचा आज मृत्यू झाल्यानंतर बहिणीसह आई वडीलांवर दुःखाचा डोंगर कोसळला.


कॉपी करू नका.