साकेगावातील तरुणाचा विद्युत शॉक लागल्याने मृत्यू

0

A young man from Sakegaon died due to electric shock भुसावळ : भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथील 36 वर्षीय तरुणाचा झाडाची फांदी तोडताना विद्युत लागल्याने मृत्यू झाला. ही घटना मंगळवार, 16 रोजी घडली. किशोर पंढरीनाथ कोळी (36, श्रीराम नगर, साकेगाव) असे मयताचे नाव आहे.

कोळी हे मंगळवारी झाडाची फांदी तोडत असताना त्यांना विद्युत शॉक बसला व जखमी अवस्थेत त्यांना जळगाव सिव्हील रुग्णालयात दाखल करण्यात आले असता सायंकाळी सव्वा पाच वाजता त्यांचा मृत्यू ओढवला. तपास हवालदार संजय भोई करीत आहेत.


कॉपी करू नका.